मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

Weekly Jomdar

लालपरी (एसटी) कर्मचाऱ्यांनी दिला लग्नातून आगळा वेगळा संदेश 
(प्रतिनिधी स्वामीदयानंद) उस्मानाबाद  जिल्ह्यातील तुळजापूर आगारातील कर्मचार्यांनी आपल्या मुलांचे लग्न हे अनोख्या पध्दतीने लावलेत  महाराष्ट्र राज्य परिवहन  महामंडळातील तुळजापूर आगारातीत  मेकॅनिक असलेल्या नागनाथ झाडपिडे याचे सुपुत्र शुभम आणि कंडक्टर असलेल्या गोपीनाथ परमाळ याची कन्या नम्रता यांचा विवाह अनोखा साजरा झालाय 
    हा विवाह  तुळजापूर रोडवरील मनीषा मंगल कार्यालयात करत असताना आपण  ST महामंडळाचे कर्मचारी आहोत आणि सध्या संप सुरु  आहे म्हणून आपल्या मुला मुलीच्या लग्नात वर्हाडी मंडळीसह नागरीकांना हे st च महत्व पटवून देण्याचा एक अनोखा संदेश देण्याचा निर्णय नवरा वरीच्या वडिलांनी घेतला 
       एसटी कशी सर्वासाठी आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी प्रवेशद्वारावर sT बसची प्रतिकृती उभी करून संपूर्ण हॉल मध्ये st चे फ्लेक्स लावून वऱ्हाडी मंडळीला वेगळाच अनुभव पहायला मिळालाय
   विशेष म्हणजे  लग्नात स्वरात मंगलाष्टके ही ST च्याच गाण्यात आल्याने सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या . नवऱदेवाने आणि नवधूने उखानेही ते एसटी  चेच घेतलेत

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

परिस्थिती नाही बरी आमच्या घरी, खाऊन शिळी भाकरी फिरतोय घेऊन लालपरी आम्ही ...

मुक्कामाला सोय केली आमची खास  सोबत झोपायला ढेकूण आणि डास.
आणि ग्रामीण मुक्कामाला उघड्यावर संडास.  परिस्थिती नाही बरी आमच्या घरी, खाऊन शिळी भाकरी फिरतोय घेऊन लालपरी आम्ही एसटी कर्मचारी