मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य

मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
 मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
बोरगांव(वृत्तसेवा): माळेवाडी(बो) येथील मातंग समाजाचे धनाजी आनंता साठे यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

पत्रकार अश्विन केळकर यांनी बहिणींन सोबत केले रक्षाबंधन साजरे

रक्षा बंधनच्या सर्व दर्शकांना  हार्दिक शुभेच्छा  पत्रकार अश्विन केळकर यांनी बहिणींन सोबत केले रक्षाबंधन साजरे 

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

# ड्रायव्हर भाऊंची होणारी वाटमारी लूट थांबणार का? ड्रायव्हर भाऊ संघटना आ...

# ड्रायव्हर भाऊंच्या व्यथा सरकार ऐकणार का ? 
# ड्रायव्हर भाऊंची होणारी वाटमारी लूट थांबणार का? 
ड्रायव्हर भाऊ संघटना आक्रमक 

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

Weekly Jomdar Live अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन, दूध उत्पादक आंदोलनात ...

अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन, दूध उत्पादक आंदोलनात सहभागी.
सविस्तर माहिती अशी. वेळोवेळी मागणी करून देखील. भाव वाढवून मिळत नसल्याने. आज उंबरे पागे. तालुका पंढरपूर. या ठिकाणी दूध संकलित केंद्रासमोर सरकार रुपी दगड ठेवून अभिषेक घालण्यात आला.यावेळी त्या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे बाळराजे कानगुडे. व दूध उत्पादक शेतकरी. उपस्थित होते. सरकारला जाग येई पर्यंत. अशीच आंदोलने  महाराष्ट्रातून करण्यात येतील असे सांगितले. सरकार या प्रश्नावर कायमचा तोडगा कधी काढणार?. हेच पाहणे आहे. सरकार तोडगा काढते की या दूध आंदोलनाला थांबवण्यासाठी आश्वासनाची फक्त खिरापत देते हे पाहणे पण तितकेच महत्वाचे आहे.

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

Weekly Jomdar Live

नागपुरातील तरुणांचा  मनसेत प्रवेश 

एक अनोळखी मृतदेह सापडला.पण कमिश्नर कार्यालयास हद्द कोणाची माहित नसल्याने...

काल सोलापूर मधील कुंभारी गावाजवळ विजय नगर मध्ये एक अनोळखी मृतदेह सापडला.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, विजयनगर येथील रहिवाशी बसवानती यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना आमचे प्रतिनिधी दयानंद स्वामी यांना दिसला त्यांनी लागलीच त्याची माहिती पोलीस कमिशनर यांच्या कार्यालयात कळवली. आणि जागरूक नागरिक, व पोलीस मित्र या नात्याचा धर्म पाळला. परंतु पोलीस कमिशनर कार्यालयाने, एसीपी ऑफिस, एसीपीने, कंट्रोल रूम, कंट्रोल रूमने, पोलीस स्टेशनं असे आमचे प्रतिनिधी दयानंद स्वामी यांना नंबर दिले. नंतर स्वामी यांनी फोन केल्यावर एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यातील पोलीस घटना स्थळी पोहोचले. पण कारवाई काहीच न करता ही हद्द आमची नाही ग्रामीणची आहे त्यांना आम्ही कळवतो असे सांगून निघून गेले.
किती ही सोलापूर पोलिसांची व तेथील पोलीस कमिशनर ऑफिसची तत्परता असेल हे लक्षात येते. स्वामी यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधला. म्हणून आम्ही देखील तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तेव्हा ग्रामीण वाल्याना आम्ही कळवले आहे अशी उत्तर देण्यात आली.
खरेतर पोलिसांचा हद्दीचा वाद कायम असतो हे खरे असले तरी पोलीस कमिशनर ऑफिस यांना आमच्या प्रतिनिधीनी स्वामी यांनी लोकेशन सांगितले असताना ते लोकेशन कोणाच्या हद्दीत येते हे लक्षात येत नाही ही सर्वात मोठी आश्चर्यची बाब म्हणावी लागेल.
पोलिसांनी सर्व सोपस्कार करून जनतेला आव्हान केले काय म्हणाले आपण त्यांच्याच तोंडून ऐकू 
स्टुडिओतून मी हेमंत केळकर दयानंद स्वामी सह न्यूज एटीन महाराष्ट्र लाईव्ह  सोलापूर
आमच्या चॅनल ला आजच सबस्क्राय करा लाईक करा आणि शेअर कराययला विसरू नका

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१