गुरुवार, २४ जून, २०२१

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह

आज वटपौर्णिमा सर्व सन्माननीय महिला भगिनींना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.
वटपौर्णिमा या सणातून पती व पत्नी यांचे नाते संबंध दृढ व्हावे ही या मागील संकल्पना. जी आजही महिला भगिनीं जपत आहेत.
   कोणी कितीही आणि काहीही बोललं तरी आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. ती वाढवायची आहे. सोबतच येणाऱ्या पिढीला नीट समजावून त्यांना संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी द्यायचा आहे.
 वट वृक्षाला पारंपरिक, अध्यात्मिक, व सायंटिफिक असे महत्व दिले आहे. वटवृक्षाला युगपुरुष असेही नाव दिले आहे. या वटवृक्षाची वाटपौर्णिमे निमित्त महिला भगिनींनी मनोभावे पूजा केली त्याची काही दृश्य आम्ही स्क्रीन वर दाखवत आहोत.
    कोणी काही म्हणो. कितीही युग बदलो. पण आम्ही आमची संस्कृती जपणारच. हे या पूजनातून महिला आज पर्यंत दाखवत आल्या आहेत. यातील त्यांच्या भावना कायम लक्षात ठेवल्या तरी घरातील तंटे कमी होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा