जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य अंतरगाव ता.नायगाव येथील वाहन चालक मारोती माधवराव शिंदे वय 36 वर्ष यांची वडीलोपर्जित फक्त दोन एकर शेती आहे.सततच्या नापिकी मुळे दोन एकर शेतीवर कुटूंबाची गुजरान होत नव्हती. कारण त्यांच्या मागे वयस्कर आई वडील पत्नी व दोन शाळकरी मुलीं आहेत.
कुटूंबाचे व्यवस्थित भरण पोषण व दोन मुलीचे शिक्षण व्यवस्थीत व्हावे या उद्देशाने मोरोती शिंदे यांनी जोड धंद्यासाठी काहि रक्कम उधार उसणवार करूण डाउनपेमेंट भरूण महिंद्रा मँक्झीमो हे वाहन खरेदी केले होते.उर्वरित रकमेसाठी त्यांनी श्रीराम सिटी ह्या फायनंस कंपनीचे लोन घेतलेले होते.परंतु मागील वर्षा पासुन कोरोना मुळे वाहतूक व्यवसाय ठप्प आसल्या कारणाने त्यांच्या गाडीचे काहि हप्ते थकीत होते.
थकीत हफ्ते भरण्यासाठी श्रीराम सिटीचे रिकव्हरी एजंट मारोती शिंदे यांना नोटिसा पाठवून फोन करूण सतत मानसिक त्रास देत होते.या एकमेव कारणाने मारोती शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे दि. 28/6/2021 कोजी उघडकीस आले.
दि.30/6/2021 रोजी जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांचे मार्गदर्शनाखाली बाबुभाई शेख बरबडा नायगाव येथील संस्थेच्या चालकांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेतली व विचार पूस केली आसता पिडिताच्या पत्नीने कळवले की श्रीराम सिटीच्या वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळुनच माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. श्रीराम सिटी नांदेड शाखेचे मैनेजर व वसुली एजंट यांचेवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुना नोंद करूण संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच पिडीत कुटूंबास दहा लाख रूपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आशी मागणी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे संस्थेच्या वतीने तिव्र आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असे संस्थेचे संस्थापक श्री संजय हाळनोर यांनी कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा