बुधवार, ३० जून, २०२१

Weekly Jomdar Live

 ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र यांची दोन ठिकाणी बैठक संपन्न झाली.

Weekly Jomdar Live

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य अंतरगाव ता.नायगाव येथील वाहन चालक मारोती माधवराव शिंदे वय 36 वर्ष यांची वडीलोपर्जित फक्त दोन एकर शेती आहे.सततच्या नापिकी मुळे दोन एकर शेतीवर कुटूंबाची गुजरान होत नव्हती. कारण त्यांच्या मागे वयस्कर आई वडील पत्नी व दोन शाळकरी मुलीं आहेत.
कुटूंबाचे व्यवस्थित भरण पोषण व दोन मुलीचे शिक्षण व्यवस्थीत व्हावे या उद्देशाने मोरोती शिंदे यांनी जोड धंद्यासाठी काहि रक्कम उधार उसणवार करूण डाउनपेमेंट भरूण महिंद्रा मँक्झीमो हे वाहन खरेदी केले होते.उर्वरित रकमेसाठी त्यांनी श्रीराम सिटी ह्या फायनंस कंपनीचे लोन घेतलेले होते.परंतु मागील वर्षा पासुन कोरोना मुळे वाहतूक व्यवसाय ठप्प आसल्या कारणाने त्यांच्या गाडीचे काहि हप्ते थकीत होते. 
थकीत हफ्ते भरण्यासाठी श्रीराम सिटीचे रिकव्हरी एजंट मारोती शिंदे यांना नोटिसा पाठवून फोन करूण सतत मानसिक त्रास देत होते.या एकमेव कारणाने मारोती शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे दि. 28/6/2021 कोजी उघडकीस आले.
दि.30/6/2021 रोजी जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांचे मार्गदर्शनाखाली बाबुभाई शेख बरबडा नायगाव येथील संस्थेच्या चालकांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेतली व विचार पूस केली आसता पिडिताच्या पत्नीने कळवले की श्रीराम सिटीच्या वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळुनच माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. श्रीराम सिटी नांदेड शाखेचे मैनेजर व वसुली एजंट यांचेवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुना नोंद करूण संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच पिडीत कुटूंबास दहा लाख रूपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आशी मागणी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे संस्थेच्या वतीने तिव्र आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असे संस्थेचे संस्थापक श्री संजय हाळनोर यांनी कळवले आहे.

News 18 Maharashtra

सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फोंडेशन च्या महाराष्ट्र सचिव पदी हेमंतकुमार केळकर यांची वर्णी अखंड भारत झुंझार पत्रकारांची लढाऊ संघटना 

मंगळवार, २९ जून, २०२१

Weekly Jomdar Live

साप्ताहिक नामदार लायक व साप्ताहिक आठवण लेखणीची कार्यालयात हेमंतकुमार केळकर यांचा  दोन्ही पेपरच्या सहसंपादकांच्या हस्ते सत्कार 

Weekly Jomdar Live

सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या विशेष सभेत हेमंतकुमार केळकर यांची  महाराष्ट्र सचिव पदी वर्णी. हि सभा बाळासाहेब भालेराव संस्थापक अध्यक्ष सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेची विशेष सभा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

शनिवार, २६ जून, २०२१

Weekly Jomdar Live

दक्षिण सोलापुरात परत पावसाचे आगमन बळीराजा सुखावला 

शुक्रवार, २५ जून, २०२१

News18 Maharashtra

एका अवलियाने सोलापुरात स्वखर्चाने केली साफसफाई, सॅनिटाईज करायला सुरवात.
समाजसेवी संस्थांनी द्यावा याला मदतीचा हाथ एवढीच अपेक्षा 

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह

ग्राम संवाद सरपंच संघाचा महाराष्ट्र विद्युत मंडळा पहिले आमचे पैसे द्या मग तुमचे मागा आणि असे न झाल्यास आम्ही हे खपून घेणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवार, २४ जून, २०२१

News18 Maharashtra

वटसावित्र सण आणि वडाचे महत्व या बाबत जाणून घेऊ सहसंपाद्क अभिजित आपटे यांच्या  स्पेशल रिपोर्ट मधून सहसंपादक अभिजित आपटे मोबाईल नंबर 7888260855

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह

आज वटपौर्णिमा सर्व सन्माननीय महिला भगिनींना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.
वटपौर्णिमा या सणातून पती व पत्नी यांचे नाते संबंध दृढ व्हावे ही या मागील संकल्पना. जी आजही महिला भगिनीं जपत आहेत.
   कोणी कितीही आणि काहीही बोललं तरी आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. ती वाढवायची आहे. सोबतच येणाऱ्या पिढीला नीट समजावून त्यांना संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी द्यायचा आहे.
 वट वृक्षाला पारंपरिक, अध्यात्मिक, व सायंटिफिक असे महत्व दिले आहे. वटवृक्षाला युगपुरुष असेही नाव दिले आहे. या वटवृक्षाची वाटपौर्णिमे निमित्त महिला भगिनींनी मनोभावे पूजा केली त्याची काही दृश्य आम्ही स्क्रीन वर दाखवत आहोत.
    कोणी काही म्हणो. कितीही युग बदलो. पण आम्ही आमची संस्कृती जपणारच. हे या पूजनातून महिला आज पर्यंत दाखवत आल्या आहेत. यातील त्यांच्या भावना कायम लक्षात ठेवल्या तरी घरातील तंटे कमी होतील.

रविवार, १३ जून, २०२१

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह

पुढारी पेपरच्या पत्रकारावर केलेल्या हल्याचा निषेध पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या दिरंगाई मुळेच पत्रकारांचे जीव धोक्यात 

शुक्रवार, ११ जून, २०२१

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वर्धापनदिना निमित्त मोडनिंब येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोना पेशंट यांना ड्रायफुड नाष्टा राष्ट्रवादी युवक व युवती कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला.

शुक्रवार, २१ मे, २०२१

साप्ताहिक जोमदार लाईव्ह

खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ट पो. निरीक्षक मा.श्री अशोक पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली 
सिंधी समाज व खडकपाडा पोलीस स्टेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने टिटवाळा जवळील पारस बाल आश्रम व वृद्धाश्रम येथे समक्ष भेट देऊन सदर आश्रमात असणाऱ्या 50 गरजु लहान मुलांच्या एक महिन्याचे रेशन व खाऊ ची भेट देण्यात आले

समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह