राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत उघडली खाती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुर्ला विधानसभा वार्ड क्र. १७० चुनाभट्टी विभागातील जनसंपर्क कार्यालयात वार्ड क्र. १७०/१७१ च्या नागरिकांच्या १० वर्षा आतिल मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लोकप्रिय नगरसेवक कप्तान मलिक यांच्या सहकार्याने भारतीय टपाल मार्फत राबविण्यात येत असलेल्या "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत खाते उघडले. प्रत्येक खाते नगरसेवक कप्तान मलिक यांच्या स्वखर्चाने सुरू करण्यात आले. यावेळी कुर्ला पोस्ट ऑफीस कर्मचारी यांच्या हस्ते कप्तान मलिक यांचा सत्कार केला व माय स्टॅम्प देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी समाजसेवक नदीम कप्तान मलिक यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक चे मुंबई सचिव प्रतीक पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कुर्ला चुनाभट्टी विभागातील पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्या हस्ते सत्कार केला. नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष १७० चे मेहबूब पटेल, राष्ट्रवादी युवक १७१ चे जुबेर खान (मोहसिन) राष्ट्रवादी युवक १७० चे वार्ड अध्यक्ष लोगनादन तेवर इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा